कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया

0

* प्रकृती स्थिर, काही दिवस रुग्णालयातच विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला

* मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे, बाळासाहेब थोरातांकडून तब्येतीची विचारपूस

मुंबई  – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात करण्यात आली आहे. त्यांना अनेक दिवसांपासून पित्त व पोटदुखीचा त्रास होता. मात्र सतत दौरे, सभा, कामकाज यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष होत होते. मात्र आता पोटदुखीचा त्रास वाढल्याने शस्त्रक्रिया करावी लागली आहे.

मुंबईच्या गिरगाव भागातील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात मुंडेंच्या पित्ताशयावर (gall bladder) डॉ.अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. बुधवारी (ता.24) त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर शुक्रवारी (ता.26) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असुन, डॉक्टरांनी आणखी चार ते पाच दिवस रुग्णालयातच विश्रांती व पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंडेंच्या तब्येतीची दूरध्वनीवरून विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भाजप नेत्या आ.पंकजाताई मुंडे यांच्यासह माजी खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही मुंडे यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech