मुंबई – माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती प्रदीप शर्मा यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह शर्मा यांच्या मुली अंकिता शर्मा आणि निकिता शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात पीएस फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच अंधेरीमधील काही प्रश्न असतील तर ते सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील असेही सांगितले.