मुंबई – कालभाईंदर स्थानकादरम्यान पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चर्चगेटकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळी ६:३० वाजता झालेल्या या बिघाडामुळे विरार-चर्चगेट मार्गावरील लोकल ट्रेन १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.परिणामी, सकाळी ऑफिसला जाणाऱ्या चाकरमाण्यांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला . प्रवाशांनी पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या बिघाडांबद्दल नाराजी व्यक्त केली. यामुळे त्यांना दरवर्षी मानसिक दबावाचा सामना करावा लागतो. पश्चिम रेल्वेने ट्वीटद्वारे बिघाडाची माहिती दिली आणि लवकरच तो दुरुस्त करण्यात आला असल्याचे सांगितले. मात्र, प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली. सकाळच्या गर्दीच्या वेळी लाखो प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करत असतात. अशा वेळी अचानक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला, त्यामुळे अनेकांना ऑफिस आणि शाळा-कॉलेजला पोहोचण्यास उशीर झाला. पश्चिम रेल्वेने प्रवाशांना सहकार्य करण्याचेही आवाहन केले.