दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३० रुपये दर देणे बंधनकारकच…! अन्यथा गुन्हे दाखल करा….?

0

दुग्धव्यवसाय विकासमंत्री विखे पाटील यांचे सक्त आदेश….

मुंबई – दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीस रुपये दर न दिल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे सक्त आदेश देत, दुधातील भेसळ रोखण्यासाठी कडक उपाय योजना करण्यात येत असून, तक्रार येणाऱ्या दुध संकलन केंद्राची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी करावी. मात्र तरीही भेसळयुक्त दुध आढळुन आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यांत आल्याचे माहिती राज्याचे महसूल,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक दुध संकलन केंद्रावर उच्चप्रतीच्या दुधाचे संकलन करण्यात यावे.दुधाच्या गुणवत्तेमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करत जिल्ह्याचा उत्तर व दक्षिण विभागामध्ये दुधाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी पथक गठित करण्यात येऊन त्यांच्यामार्फत दुधाची तपासणी करण्यात यावी.तपासणीमध्ये दुधामध्ये भेसळ आढळुन आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी.तसेच दुधसंकलन केंद्रावर दुध देणाऱ्या शेतकऱ्यांना ३० रुपये प्रतीलिटर दर देण्याचाही शासनाने निर्णय घेतला असून जे केंद्र शेतकऱ्यांना ३० रुपयांचा दर देणार नाहीत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश देत प्रत्येक दुध संकलन केंद्रावर संकलित होणाऱ्या दुधाची माहिती मिळावी यासाठी विशेष ॲप तयार करण्याच्या सुचनाही दिल्याचे विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech