आता शिर्डी होणार उद्योगनगरी…..!

0

पालकमंत्री विखे पाटील यांचा विश्वास…

मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उभारल्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी घेतल्याने शिर्डी आता साई बाबांची नगरी सोबतच उद्योगनगरीही यापुढे ओळखली जाईल असा विश्वास अहिल्यानगरी(अ.नगर) चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांनाही मान्यता देण्यात आली असून यामुळे आता शिर्डी एमआयडीसीचा विकास जलद गतीने असा दावा ही विखे पाटील यांनी केला.

डिफेन्स क्लस्टर अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या उद्योगासाठी १००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना सवलतीच्या दरात २०० एकर जमीन देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतल्याने यासंदर्भात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलाविण्यात आली होती.या बैठकीला महसूल तथा पालकमंत्री अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

शिर्डी एमआयडीसी परिसर हा ५०२ एकर असून यातील २०० एकर जागा सवलतीच्या दरात देण्याचे आदेश उद्योगमंत्री सामंत यांनी दिले. तसेच इतर सवलतीच्या दरांसाठी राज्यमंत्रीमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही त्यांनी याच बैठकीत दिल्याचेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

सदरचा निर्णय हा शिर्डी, अहमदनगर, नाशिक तसेच आसपासच्या जिल्ह्यासाठी महत्वाचा असून यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. शिर्डी क्षेत्र हे देवस्थान म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात उद्योग येणार असल्याने एक औद्योगिक हब म्हणून येणाऱ्या काळात नव्याने उदयास येईल असाही विश्वास विखे पाटिल यांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech