तामिळनाडूमधील डीएमकेच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान
चेन्नई – डीएमके नेते आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री एस.एस. शिवशंकर यांनी भगवना श्रीरामांबद्दल वादग्रस्त विधान केलेय. रामाचे अस्तित्व सिद्ध करणारा ऐतिहासीक पुरावा नसल्याचे आक्षेपार्ह विधान शिवशंकर यांनी केले. अरियालूर जिल्ह्यातील गंगईकोंडाचोलपूरम येछे राजेंद्र चोल जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी हे विवादीत वक्तव्य केले.
डीएमकेचे मंत्री शिवशंकर म्हणाले की, आम्ही चोल वंशाचे सम्राट राजेंद्र चोल यांचा जन्मदिवस साजरा करतो. आमच्याकडे शिलालेख, त्यांनी बांधलेली मंदिरं आणि त्यांनी बांधलेले तलाव यासारखे काही पुरातत्विय पुरावे आहेत. मात्र, भगवान रामाच्या इतिहासाचा शोध घेण्यासाठी कुठलाही पुरावा नाही आहे. भगवान राम हे 3 हजार वर्षांपूर्वी होते, असा दावा करण्यात येतो. ते अवतारी पुरुष होते, असे सांगितले जाते. मात्र, अवतार जन्माला येऊ शकत नाही. जर राम अवतार होते, तर त्यांचा जन्म होऊ शकत नाही. तसेच जर त्यांचा जन्म झाला असेल तर ते देव असू शकत नाहीत असा दावाही त्यांनी केला. शिवशंकर यांनी यावेळी रामायण आणि महाभारतावर टीका केली. ते म्हणाले की, रामायण आणि महाभारतामध्ये लोकांना शिकण्यासारखा कुठला धडा नाही आहे. मात्र तामिळ कवी तिरुवल्लूर यांनी 2 हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या दोह्यांच्या संग्रहामध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे. दरम्यान, शिवशंकर यांनी केलेल्या विधानांवर भाजपाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपाचेतामिळनाडूमधील प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी डीएमकेचे नेते शिवंशकर यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला आहे.