कोलंबो – आयएनएस शल्की ही शिशुमार श्रेणीतील डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून ती 7 फेब्रुवारी 1992 रोजी भारतीय नौदलात दाखल करण्यात आली. भारतीय नौदलाची आयएनएस शल्की ही पाणबुडी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी श्रीलंकेत कोलंबो येथे दाखल झाली. या पाणबुडीचे 2 ऑगस्ट रोजी श्रीलंकेच्या नौदलाकडून समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान, या पाणबुडीचे कमांडिंग अधिकारी श्रीलंकेच्या वेस्टर्न नेव्हल एरिया कमांडर ऍडमिरल डब्लूडीसीयू कुमारसिंघे आणि त्यानंतर श्रीलंकेच्या नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी झाल्या. श्रीलंकेतील भारताच्या उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचारी आणि श्रीलंकेच्या संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांनी देखील या पाणबुडीला भेट दिली.
आयएनएस शल्की ही शिशुमार श्रेणीतील डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून ती 7 फेब्रुवारी 1992 रोजी भारतीय नौदलात दाखल करण्यात होती या आयएनएस शल्की बांधणी भारतात करण्यात आलेली ही सर्वात पहिली पाणबुडी आहे. यापूर्वी कल्वरी श्रेणीतील आयएनएस कारंज आणि आयएनएस वागीर या पाणबुड्यांनी फेब्रुवारी 2024 आणि जून 2023 रोजी (आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी) कोलंबोला भेट दिली होती.