सिंधुदुर्गातील 3 रेल्वे स्थानकांचा उद्या सुशोभीकरण लोकार्पण सोहळा

0

कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडीरोड स्थानकांचे सुशोभीकरण

सिंधुदुर्ग – सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कणकवली, सिंधुदुर्गनगरी तसेच सावंतवाडी रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण व सुशोभिकरण कामाचा लोकार्पण कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ९ ऑगस्ट रेाजी होणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देखील वाटप करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान सभा सदस्य नितेश राणे, वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शरद राजभोज, अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड आदी उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता कणकवली रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामाचा लोकार्पण कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देखील वाटप , दुपारी १२:०० वाजता सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामाचा लोकार्पण कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देखील वाटप , दुपारी ०३:०० वाजता सावंतवाडी रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामाचा लोकार्पण कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देखील वाटप करण्यात येणार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech