रत्नागिरी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील दोन लाख ७४ हजार ३४६ लाभार्थ्यांना ८२ कोटी ३० लाख ३८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा निधी आहे. या रकमेचे वितरण महिलांना करण्यात येणार आहे.
मंजूर झालेल्या निधीची तालुकानिहाय आकडेवारी अशी – (तालुका, दाखल झालेल्या अर्जांची संख्या आणि देण्यात आलेली रक्कम या क्रमाने) – मंडणगड – १०,१७८ अर्ज, ५,४५,३४,००० मंजूर रक्कम. दापोली – ३१,३७० अर्ज, ९,४१,१०,००० रक्कम, खेड – २९,३०४ अर्ज, ८,७९,१२,००० रक्कम, चिपळूण – ४३,७७८ अर्ज, १३,१३,३४,००० रक्कम, गुहागर – २४,५४३ अर्ज, ७,३६,२९,००० रक्कम, संगमेश्वर – ३२,५३२ अर्ज, ९,७५,९६,००० रक्कम, रत्नागिरी – ५३,९१२ अर्ज, १६,१७,३६,००० रक्कम, लांजा – १८,९०१ अर्ज, ५,६५,०३,००० रक्कम, राजापूर – २९,८२८ अर्ज, ८,९४,८४,००० मंजूर झालेली रक्कम. (एकूण – २,७४,३४६ अर्ज, ८२,३०,३८,००० मंजूर झालेली रक्कम.)