बारसू-नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरू – पालकमंत्री

0

रत्नागिरी – नाणार येथे बॉक्साईट संदर्भात केंद्र शासनाने निर्देश दिल्यानुसार होणाऱ्या सुनावणीबाबत प्रांताधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा, अशा सूचना देतानाच ही सुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी आजच्या बैठकीत दिले. बारसू आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत कार्यवाहीदेखील सुरू करण्याची सूचना त्यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज पालकमंत्री श्री. सामंत यांनी विविध विषयांबाबत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

नाणार आणि परिसरातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासोबत आज बैठक झाली. यावेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, बॉक्साइट उत्खननासंदर्भात होणारी सुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित ठेवा. प्रांताधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी करुन अहवाल सादर करावा. त्याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी अहवाल तयार करुन केंद्र शासनाकडे पाठवावा. राज्य शासनाने ३१ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार बारसू आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech