जीवन गौरव पुरस्कार जाहीर…..!

0

* आशा पारेख यांना स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार तर शिवाजी साटम यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार जाहीर…..!

* सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली घोषणा….. 

 

मुंबई – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३ करिता जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांची तर चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३ करिता ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी येथे केली.

हे पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येत्या बुधवार २१ ऑगस्ट २०२४ ला सायंकाळी ७ वाजता,NSCI डोम, वरळी मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत,अशी माहिती महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिली आहे.

स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कारचे स्वरूप १० लाख रुपये रोख,मानपत्र व मानचिन्ह असे असणार आहे.त्या व्यतिरिक्त स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३ करिता जेष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन.चंद्रा यांची निवड करण्यात आली असून ६ लाख रुपये रोख,मानपत्र व मानचिन्ह देऊन यावेळी पुरस्कर्त्यांना गौरविण्यात येणार आहे.

चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३r करिता जेष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची निवड करण्यात आली असून त्यांना १० लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३ करिता लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांची निवड करण्यात आली असून ६ लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या सर्वांचे अभिनंदन करतांना मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, राज्याचेच नव्हे तर देशाचे सांस्कृतिक केषेत्र समृद्ध करणाऱ्या या कलाकारांचा आम्हाला अभिमान असून त्यांना पुरस्कार जाहीर करतांना मनापासून आनंद होत आहे. हे सर्वजण सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव अधिकाधिक उंचावत राहतील असा आम्हाला विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech