डोंबिवली – आषाढी एकादशीनिमित्त संगीत भजनोत्सव या भजन स्पर्धेचे आयोजन कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे गेल्या ८ वर्षांपासून दरवर्षी केले जाते. यावर्षी देखील १० आणि ११ ऑगस्ट रोजी कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे संगीत भजनोत्सव आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गणशोत्सव जवळ आल्याने मंगळागौर या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. मंगळागौर कार्यक्रमाला सुप्रसिध्द अभिनेते भरत जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पहिल्या सत्रात महिला भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ११ ऑगस्ट रोजी म्हणजेच रविवारी पुरुषांकरिता भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि नंतर सायंकाळी पारितोषिक वितरण सोहळा व कोकण रत्न पुरस्कार सोहळा पार पडला.
या भजन स्पर्धेचे विजेते आहेत
महिला गट :- प्रथम पारितोषिक विजेते :- विठाई भजन मंडळ, डोंबिवली,द्वितीय पारितोषिक विजेते :- दादरेकर प्रसादिक भजन मंडळ, दिवा, तृतीय पारितोषिक विजेते :- वरद सिद्धिविनायक, डोंबिवली,
पुरुष गट:- प्रथम पारितोषिक विजेते :- सुरताल भजनी मंडळ, नारंगी खालापूर, द्वितीय पारितोषिक विजेते :- श्री सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ, दिवा, तृतीय पारितोषिक विजेते :- गांगो रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मालाड
वैयक्तिक पारितोषिक:- उत्कृष्ट गायक पुरुष, श्रीकांत नारायण राणे (साईलीला प्रासादिक भजन मंडळ, भांडूप), उत्कृष्ट गायिका महिला तृतीय गंगाराम मेस्त्री, (तृतीया भजन मंडळ, डोंबिवली), पखवाज वादक पुरुष, सिद्धेश दुखणंदे, (महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, भांडूप), पखवाज वादक महिला वैष्णवी कोयडे (स्वामीकृपा भजन मंडळ, डोंबिवली) चकवा वादक पुरुष राजू कानडे (वेताळ प्रासादिक भजन मंडळ, दहिसर) चकवा वादक महिला (स्वर साधना भजन मंडळ) तसेच यंदाचे पुरस्काराचे मानकरी आहेत,
कोकण समाज रत्न – रमेश शिर्के, कोकण साहित्य रत्न – रामदास खरे , कोकण कृषी रत्न – महेश सप्रे, कोकण क्रीडारत्न – निलेश कुळये, कोकण उद्योगरत्न – अभिजित भगत आणि अशोक शिरसाट, कोकण शिक्षणरत्न – प्रिया मांडवकर, कोकण शौर्यरत्न – अजित मोरे, कोकण कलारत्न – मिलिंद अधिकारी, कोकण रत्न पत्रकारिता – राजेंद्रप्रसाद मसुरकर तसेच कोकण युवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे कोकण भूषण पुरस्कार रवींद्र प्रभुदेसाई यांना प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते अजित यशवंतराव, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, वैशाली दरेकर राणे माजी विरोधी पक्षनेत्या, नगरसेविका, मंदार हळबे माजी विरोधी पक्षनेता, नगरसेवक, नंदू धुळे मालवणकर माजी नगरसेवक, राहुल कामत माजी शिक्षण मंडळ सदस्य, प्रल्हाद म्हात्रे माजी शिक्षण मंडळ सदस्य, प्रतिक पाटील जिल्हा अधिकारी युवासेना कल्याण लोकसभा, प्रथमेश पुण्यार्थी जिल्हा संघटक ठाणे ग्रामीण ग्राहक संरक्षण कक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण युवा प्रतिष्ठानचे संस्थापक – धनंजय चाळके, अध्यक्ष- दिनेश मोरे, उपाध्यक्ष- सच्चिदानंद हांदे, सचिव- विराज चव्हाण, खजिनदार- रोहन मोरे तसेच रोशन मोरे, कुणाल मोरे, शुभम केगडे, साहील मोरे, ममता घाग आणि श्री कलामंचाचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.