गुप्तांगामध्ये लपवलेले ४८२.६६ ग्रॅम कोकेन जप्त

0

मुंबई – मुंबई विमानतळावर अलीकडेच ४.८३ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले, ज्यात एक केनियन नागरिक अडकला आहे. हा नागरिक इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइटने मुंबईत दाखल झाला होता, आणि त्याच्या गुप्तांगामध्ये लपवलेले ४८२.६६ ग्रॅम कोकेन सीमा शुल्क विभागाने शोधून काढले. ही घटना देशभरातील अमली पदार्थ तस्करीच्या वाढत्या घटनांमध्ये एक गंभीर भर टाकणारी आहे. यामध्ये परदेशातील व्यक्ती देशातील विविध राज्यात आपल्या एजेंट द्वारे माल पोचवण्याचे काम करतात. देशातील कस्टम विभाग अशा लोकांवर बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करण्यात येत आहे. अशीच एक कारवाई कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर केली.

सध्या परदेशातून देशात सोने, ड्रग्स, कोकेन आणण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने या तस्कराचे देशातर्गंत मोठे जाळे निर्माण झाले आहे. अमली पदार्थांच्या तस्करीने समाजावर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः तरुणाई या नशेच्या आहारी जात असून, त्याचे सामाजिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अमली पदार्थांच्या आहारी जाणारी व्यक्ती स्वतःसोबतच कुटुंबालाही उद्ध्वस्त करते. यामुळे तस्करी आणि वापरावर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.

या मोठया कारवाईत ४८२.६६ ग्रॅम कोकेन केनियन नागरिकाकडून कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर कारवाई करत तब्बल ४ कोटी ८३ लाख रुपयांचा कोकेन जप्त केले आहे. हे कोकेन एका केनियन नागरिकाने स्वत:च्या शरीरात लपवले होते. कस्टम विभागाने केनियन नागरिकाला ताब्यात घेऊन ४८२.६६ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.जप्त करण्यात आलेल्या कोकेनची बाजारातील किंमत ४ कोटी ८३ लाख असल्याचे सांगितले जात आहे. तर अटक करण्यात आलेला केनियन नागरिक असल्याची माहिती कस्टम विभागाने दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech