श्रीनगर – अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा मतदारसंघ म्हणजे पिपल्स डेमॉक्रटिक पार्टीने (पीडीपी) मेहबुबा मुक्ती यांचा बालेकिल्ला. पीडीपीचा बालेकिला असलेल्या याच मतदार संघातून मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती हिला अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. इल्तिजा मुफ्तींना निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने आता पीडीपीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पिपल्स डेमॉक्रटिक पार्टीने (पीडीपी)कडून जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय.
पीडीपीने आज, सोमवारी जाहीर केलेल्या 8 उमेदवारांच्या पहिल्या उमेदवार यादीत इल्तिजा यांचे नाव आहे. अन्य उमेदवारांमध्ये अनंतनाग पूर्वमधून ज्येष्ठ नेते अब्दुल रेहमान वीरी आणि देवसरमधून मुफ्ती यांचे काका सरताज अहमद मदनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.अनंतनागमधून माजी खासदार मेहबूब बेग, चरार-ए-शरीफमधून गुलाम नबी लोन हंजुरा आणि वॉचीमधून गुलाम मोहिउद्दीन वानी निवडणूक लढवणार आहेत. श्रीनगर मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचे आगा सय्यद रुहुल्लामेहदी यांच्याकडून पराभूत झालेले पक्षाचे युवा नेते वहीद पारा यांना अनंतनागमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
राज्यातून कलम 370 हटवल्यानंतर आईला ताब्यात घेण्यात आले त्या काळात इल्तिजा पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आली होती. ऑगस्ट 2019 च्या मध्यात, संपूर्ण दळणवळण बंदी आणि लॉकडाऊनदरम्यान, तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आपल्या श्रीनगर येथील निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यामागील कारणांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. इल्तिजा यांना खोरे सोडण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यांनी आपल्या आईला भेटण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मागितली, जी अखेर मंजूर करण्यात आली होती.