अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी शासन व समाजाच्या सहभाग आवश्यक

0

मुंबई – बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवरती शाळेमध्ये तिथल्या स्वच्छता रक्षकाने अत्याचार केल्याची माहिती समजली त्याच्यानंतर डॉ.नीलम गोऱ्हे या ताबडतोब कोल्हापूर दौऱ्यातून लगेच बदलापूरला जाऊन पोहोचल्या. आणि तिथे गेल्यावर तिथे परिस्थितीच्या मध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्या संदर्भामध्ये तपशीलवार माहिती घेतली त्यातून जे मुद्दे समोर आले त्याच्यामध्ये एक मुद्दा समोर आला की ज्याच्या संदर्भामध्ये त्या पाठपुरावा करणारे की, पॉक्सोच्या संदर्भातल्या ज्या मुलींच्या केसेस आहेत तर त्याच्यात मुलीच्या वयानुसार तिला ते संवेदनशील पद्धतीने बोलून तस ती तक्रार नोंदवण्यासाठी विविध वयाच्या मुलींच्या परिस्थितीनुसार त्याचे एसओपी व त्याच्यावर पुनर्विचार करणे गरजेचे आहे. तसेच शालेय परिसरात मुलींवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी शासन व समाजाच्या सहभागाची आवश्यकता.

दुसरा मुद्दा पोलिसांकडून ज्या दिरंगाई झाली त्याच्यापेक्षाही अधिक महत्त्वाच म्हणजे मुख्याध्यापकांनी स्वतः केस घडल्या घडल्याबरोबर किंवा पालकांनी माहिती सांगितल्या बरोबर त्या माहिती कडे दुर्लक्ष केलं आणि या संदर्भामध्ये केस नोंदवण्यासाठी टाळाटाळ झाल्यामुळे एक अत्यंत गंभीर अशी अपप्रवृत्ती समोर आलेली आहे. की ज्यामध्ये शैक्षणिक संस्थांपैकी काही जण या घटना घडल्यावर स्वतःची बदनामी होऊ नये म्हणून या घटनांच्या वरती तक्रार करणाऱ्या लोकांचे मनोधैर्य खच्ची करायचे काम करतात हे अतिशय गंभीर बाबत असून, डॉ.नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती त्या नात्याने विविध शैक्षणिक संस्थांशी संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्या काही बैठका त्या पुढील आठवड्यामध्ये घेणार आहेत.

तिसरा जो मुद्दा आला तो पोलिसांच्या या संपूर्ण कायदा सुव्यवस्थेच्या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय सक्रिय असून त्यांचे लक्ष होते. त्यांनी संवेदनशील पद्धतीने परिस्थिती हाताळली आणि या मध्ये वेगवेगळ्या घटकांशी बोलून त्यामध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संयमाने परिस्थिती हाताळल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अजून अनर्थ टळला. परंतु कुठल्याही जेव्हा आपण राज्यघटनेचा विचार करतो त्यावेळेला न्यायप्रक्रिया झाल्याशिवाय दोषीना शिक्षा देता येत नाही. म्हणून याबद्दल लवकरात लवकर म्हणजे दोन महिन्याच्या आत मध्ये निकाल लागावा , फास्ट ट्रक कोर्टात प्रकरण चालवावे असा प्रयत्न डॉ.गोऱ्हे विविध यंत्रणांच्या बरोबर करत आहेत.

आज आरोपीची आधीची जामिनाची मुदत संपते, पोलीस यांच्या कस्टडी ऐवजी त्याला अधिक कुठल्याही परिस्थितीत जामीन मिळता कामा नये याबद्दल कालच पोलिसांनी अशा पद्धतीची योग्य पावलं याबाबत चर्चा डॉ.गोऱ्हे यांनी पोलिसांशी केली आहे. मुलींनी बालसमूपदेशकांशी बोलून पुढच्या चार-पाच दिवसात मनावर जो आघात झालाय तो दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी पोलिसांना केल्या आहेत.

या निमित्ताने अजून काही मुद्दे समोर आलेले आहेत आणि ते म्हणजे शैक्षणिक संस्थांच्या मध्ये असणाऱ्या ज्या पालक आणि शिक्षक यांच्या संघटना आहेत त्यांचा अधिक मोठा सहभाग या सगळ्या कामात असणं गरजेचं आहे. सन्माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या विषयांमध्ये अतिशय चांगलं लक्ष घातलं आहे आणि त्यामध्ये त्यांना सहकार्य करून त्याच्यामध्ये अधिक चांगली अंमलबजावणी व्हावी यानुसार डॉ.नीलम गोऱ्हे लाडकी बहिण योजनेसाठी दौरा करता आहेत. त्यावेळेला तेथील शिक्षणाधिकाऱ्यांशी सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा करणार आहेत. डॉ.गोऱ्हे ह्या नगर ला दिनांक : 22 ऑगस्ट, 2024, दिनांक : 23 ऑगस्ट, 2024 ला तर नाशिक दिनांक : 24 ऑगस्ट, 2024 तारखेला अक्कलकुवा या ठिकाणी जाणार आहेत तर त्या ठिकाणी देखील या विषयाचा शिक्षण संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्याबद्दल शिक्षकांना विभाग आणि पोलीस यांनी एकत्रित करण्याचे काम या संदर्भात देखील त्या आढावा घेणारे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech