राम मंदिरात भाविकांनी दान केलं 20 किलो सोनं

0

अयोध्या : आर्थिक वर्ष 2023-24च्या अखेरीस झालेल्या हिशोबानुसार, भाविकांनी जवळपास 363 कोटी 34 लाख रुपयांचं दान रामचरणी अर्पण केल्याची माहिती समोर आलीये. तसंच मंदिराच्या बांधकामासाठी तब्बल 13 क्विंटल चांदी आणि 20 किलो सोनंसुद्धा भाविकांनी दान दिलं. अयोध्येत श्री राम जन्मभूमी ट्रस्टकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंदिराच्या बांधकामात किती नेमके पैसे खर्च झाले याबाबत चर्चा झाली. त्यावेळी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ही सविस्तर माहिती दिली.

2023-24 या आर्थिक वर्षात राम मंदिराच्या काउंटरवर 53 कोटींचं दान मिळालं. प्रभू श्रीरामांच्या दानपेटीत 24 कोटी 75 लाख रुपये आणि ऑनलाईन माध्यमातून 71 कोटी रुपयांचं दान मिळालं. जवळपास 11 कोटी रुपये विदेशातील भाविकांनी दिले. तसंच बँकेचा व्याज आहे 204 कोटी रुपये. अशाप्रकारे एकूण जवळपास 363 कोटी 34 लाख रुपयांचं दान विविध माध्यमातून राम मंदिराला मिळालं.

22 जानेवारी हा दिवस इतिहासात जणू सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. याच दिवशी अयोध्येच्या भव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले. तेव्हापासून देश-विदेशातून भाविक रामलल्लांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं अयोध्येत येतात. दररोज राम मंदिरात भाविकांची मांदियाळी असते. भाविक रामचरणी भरभरून दानही देतात. याव्यतिरिक्त राम मंदिराच्या बांधकामासाठी 540 कोटी रुपये आणि भाविकांसाठी सुविधा केंद्राच्या बांधकामासाठी 776 कोटी रुपयांचा खर्च आला. इतर काही कामांसाठी 180 कोटी रुपये खर्च झाले. अशात मागील 4 वर्षांमध्ये मंदिरासाठी बलाढ्य असं चांदी आणि सोनं मिळालं आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech