अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कारवाई; आम्हाला कोर्टात न्याय मिळेल

0

हैदराबाद – रंगारेड्डी जिल्ह्यातील शिल्पराममजवळील माधापूरमध्ये हायटेक सिटीजवळ प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नागार्जुन यांचा कन्वेन्शन हॉल होता. परंतु नागार्जुन यांनी तलावाच्या जमिनीवर अनधिकृतरित्या हे सेंटर उभारल्याचा आरोप आहे. नागार्जुन यांच्या कन्वेन्शन सेंटरवर चालवला बुलडोझर चालला असून ते तोडण्यात आले आहे. नागार्जुन यांचं हे एन कन्वेन्शन सेंटर 2012 मध्ये बांधण्यात आलंय. तेव्हापासूनच ते वादात सापडलं आहे. याआधी के. चंद्रशेखर राव सरकारने नोटीस बजावल्या होत्या. भास्कर रेड्डीसह इतरही अनेक लोकांनी HYDRAA कडे तक्रार दाखल केली होती. 24 ऑगस्ट रोजी हे सेंटल तोडलं गेलं. हैदराबाद आपत्ती मदत आणि संरक्षण एजन्सीच्या (HYDRAA) टीमने या कन्वेन्शन सेंटरवर बुलडोझर चालवला आहे. याप्रकरणी नागार्जुन यांची प्रतिक्रियासुद्धा समोर आली आहे. या कारवाईवरून राग व्यक्त करत ते म्हणाले, “जर कोर्टाने या सेंटरला तोडण्याचा निर्णय दिला असता तर मी स्वत: ते तोडलं असतं. मला अपेक्षा आहे की अधिकाऱ्यांच्या या चुकीच्या कारवाईविरोधात आम्हाला कोर्टात न्याय मिळेल.” अशी प्रतिक्रिया तेलुगू सुपरस्टार नागार्जुन यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे.

‘कोर्ट केसेस आणि स्थगितीचे आदेश घेऊनही बेकायदेशीर पद्धतीने आमच्या कन्वेन्शन सेंटरला तोडलं गेलंय. आम्ही ते अनधिकृतरित्या बांधलं नव्हतं. ही जागा पट्टा भूमी आहे. आम्ही तलावाची एक इंच जमीनसुद्धा त्यासाठी वापरली नाही. या सेंटरशी निगडीत तक्रारींवर आम्हाला स्थगितीचा आदेश मिळाला होता. चुकीच्या सूचनेमुळे या सेंटरला तोडलं गेलंय. सेंटरवर बुलडोझर चालवण्याआधी आम्हाला पूर्वसूचनासुद्धा दिली गेली नाही’, असं त्यांनी लिहिलंय.

नियमाचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई
हायड्राचे आयुक्त आयपीएस अधिकारी ए. व्ही. रंगनाथ म्हणाले, थुम्मिडीकुंटा तलावाच्या फुल टँक लेव्हल (FTL) क्षेत्रात कथित अतिक्रमण केल्याबद्दल अधिकाऱ्यांनी या एन कन्वेन्शन सेंटरला नोटीस बजावली होती. हे सेंटर 10 एकरांमध्ये पसरलेलं असून सुमारे 1.12 एकर जमीन तलावाच्या मालकीची आहे. आणखी दोन एकर तलावाच्या बफर झोनमध्ये आहे. “त्यांनी स्पष्टपणे नियमाचे उल्लंघन केल्यामुळे तलावाच्या 3 एकरपेक्षा जास्त जमिनीवर अतिक्रमण केलंय. त्यामुळे आम्ही तिथलं अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केली असल्याची प्रतिक्रिया दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech