बदलापूर घटनेतील आरोपीला ९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

0

Badlapur Akshay Shinde judicial custody 9 Septembe

कल्याण – बदलापुरातील दोन शालेय विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे अटक केली होती. त्याला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा त्याला न्यायालयासमोर हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची म्हणजेच ९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांना फरार आरोपी बनवण्यात आले आहे.तसेच पॉक्सो गुन्ह्यात काही कलम वाढवण्यात आली आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech