मुंबईत दिवसभरात 63 गोविंदा जखमी, उत्सवाच्या उत्साहाला अपघाताचे गालबोट

0

मुंबई – देशभरात दहीहंडीचा उत्सव साजरा होत असतानाच मुंबईत 63 गोविंदा जखमी झाल्याची माहिती पुढे आलीय. महानगरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 63 गोविंदांवर उपचार करण्यात आल्याचे बीएमसीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत संध्याकाळपर्यंत 63 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 32 गोविंदांवर उपचार सुरू आहेत. तर 8 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच 23 गोविंदांना किरकोळ दुखापत असल्यामुळे त्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. मुंबईमध्ये दहीहंडीच्या उत्सवादरम्यान संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकेडवारीनुसार 63 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी, महानगरपालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात जखमी गोविंदांवर उपचार सुरु आहेत.

सेंट जॉर्ज, पोतदार हॉस्पिटल, केईएम, राजावाडी, एमटी अग्रवाल, कुर्ला भाभा, शताब्दी या रुग्णालयांमध्ये जखमी गोविंदावर उपचार सुरु आहेत. सर्वाधिक जखमी गोविंदा पोतदार रुग्णालय, केईएम आणि नायर रुग्णालयामध्ये आहेत.दरम्यान, या सर्व जखमी गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू असून सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सध्या या सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech