रत्नागिरी जिल्ह्यात दहीहंडी उत्सव उत्साहात

0

रत्नागिरी –  रत्नागिरी जिल्ह्यात दहीहंड्या फोडण्याचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांमध्ये उत्साह संचारला आहे.

जिल्ह्यात यावर्षी २५१ सार्वजनिक आणि २ हजार ६१२ खासगी दहीहंड्या उभारण्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही दहीहंडीसाठी लाखो रुपये किमतीची बक्षिसे जाहीर केली आहेत. त्यामुळे दहीहंडीचा जल्लोष व पारितोषिके मिळविण्यासाठी मंडळामंडळांमधील चुरस व थरार अनुभवाला येत आहे. जिल्ह्यात अजून तरी कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी दहीहंड्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षी ३०९ सार्वजनिक, तर ३ हजार ४३ खासगी दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या. यावर्षी त्यात घट झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech