लाडकी बहीण’ प्रमाणेच ‘सुरक्षित बहीण’ ही जबाबदारीही आमचीच….! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही.

0

( अनंत नलावडे )

मुंबई – राज्यातील सत्तारुढ महायुती सरकार गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे सरकारकडून गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल.“लाडक्या बहिणी” प्रमाणेच “सुरक्षित बहीण” ही जबाबदारी देखील आमच्याच सरकारची असून ती आम्ही निश्चितपणे स्वीकारली आहे. त्यामुळे हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही,अशी सूस्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे एका दहीहंडी कार्यक्रमात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा खेळ पाहून आम्हालाही आमचे बालपण आठवते. आम्हीही आमच्या लहानपणी या खेळात उत्साहाने सहभागी होवून दहीहंड्या फोडत असू.आता हा उत्सव सातासमुद्रापलीकडे पोहोचलाय.अगदी “प्रो-कबड्डी” प्रमाणे हा “प्रो-गोविंदा” खेळ झाला. आणि शासनानेही या खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यताही दिली असून त्यातला साहसीपणा व धोका लक्षात घेऊनच सर्व गोविंदांचा विमा काढण्याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आली होती.आणि शासनानेही मागणी तात्काळ मान्य करत सर्व गोविंदांचा विमा काढण्यात आला,याची आठवणही त्यांनी करून दिली.

ते पुढे म्हणाले,असे असले तरी हा उत्सव सुरक्षितपणे साजरा करणे, ही आपली सर्वांची जबाबदारीच असून आपले कुटुंबीय आपली वाट पाहत असतात. कारण २०११ यावर्षी नऊ थरांचा विक्रम या दहीहंडी उत्सवात झाला होता. त्यावेळी “जय जवान” या मित्रमंडळाने हा विक्रम केला होता आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती.आपल्याकडे एकापेक्षा एक मित्रमंडळे,दहीहंडी पथके आहेत,जे या खेळामधील विक्रम दरवर्षी मोडताना दिसत आहेत.परंतु ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. यासाठी वर्षभर मेहनत घ्यावी लागते,कसून सराव करावा लागतो.एकाग्रपणे सांघिक भावनेने या खेळाचे प्राविण्य मिळवावे लागते.या गोविंदाची मेहनत बघून हे सरकार आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहीलच शिवाय जे जे शक्य आहे ते सर्व काही गोविंदांसाठी करण्यात येईल, अशीही ग्वाही देत,मुख्यमंत्र्यांनी शेवटी महिला गोविंदा पथकांचेही विशेष अभिनंदन केले.

……………….

 

Show quoted text

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech