पंढरपूर : विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे यांनी केले. पंकजा मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय पंढरपुरात काल विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी बदलापूर प्रकरणाबाबत विरोधकांच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त केला. भाजप पक्ष विरोधी पक्षात असता तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन राजकारण केले नसते, पंकजा मुंडे यांनी विरोधकांना बदलापूर प्रकरणावरुन खडे बोल सुनावले की, गेल्या दशकभरात महिला अत्याचाराच्या अत्यंत निर्घृण आणि क्रूर घटना घडत आहेत. निर्भयापासून बदलापूरपर्यंत अत्याचार घटनांमध्ये क्रूरता वाढत आहे. यामध्ये दशकभरात वेगवेगळ्या लोकांनी वेळोवेळी भूमिका बजावल्या आहेत. या घटनेत राजकारण न करता सामाजिक घटना म्हणून हाताळली पाहिजे. आपण विरोधक असतो तर अशा घटनेचे राजकारण केले नसते अशा शब्दात विरोधकांचे कान टोचले.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडित मुलीच्या पालकांची तक्रार दाखल करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी पीडित मुलीच्या पालकांना तब्बल 12 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. यावरुन गृह मंत्रालय आणि राज्य सरकारच्या कारभारावर विरोधक ताशेरे ओढत आहेत. याप्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे सारख्या आरोपींना तसेच अशा घटनातील आरोपींना नराधमांना चौकात आणून शिक्षा दिली पाहिजे, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले. यापूर्वी निर्भया घडलंय, आता बदलापूर प्रकरण घडलंय. वेळोवेळी अशा घटना घडत आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणावरुन राजकारण करण्याची गरज नव्हती, असे मत विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.