सिंधुदुर्ग – पोलिसांसमोरच नारायण राणे यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना “एकेकाला रात्रभर घरातून खेचून मारून टाकेन” अशी धमकी दिली असून त्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, काल गुरुवार दि.२८/०८/२०२४ रोजी मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलो असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार नारायण राणे यांनी गोंधळ घालत आपल्या व आपल्या सहकारी पोलिसांसमोरच, नारायण राणे यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना “एकेकाला रात्रभर घरातून खेचून मारून टाकेन” अशी धमकी दिली. या आधी सुद्धा माझे काका कै. श्रीधर नाईक यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली आहे. तेव्हा नारायण राणे हे तेरावे आरोपी होते, तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.