नवी दिल्ली – शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली असल्याची माहिती आहे. पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्राच्या गृह विभागानं मांडला आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी गृह विभाग, सीआरपीएफ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत आपल्याला अतिरिक्त सुरक्षेची आवश्यकता नसल्याचं पवारांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. तसंच जी काही सुरक्षा व्यवस्था द्यायची असेल ती घराच्या बाहेर राहू द्या. गाडी बदलणे, गाडीत 2 सुरक्षा रक्षक असण्याला त्यांनी नकार दिला आहे. दरम्यान, सुरक्षा देण्याचं कुठलंही कारण शरद पवार यांना अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही.