गडचिरोली – नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोच्या तांत्रिक समितीचा सदस्य केदार उर्फ मन्या किंजो नैताम (42) याने आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. शासनाने त्याच्यावर 6 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. केदार नैताम हा धानोरा तालुक्यातील कोसमी क्रमांक-1 येथील रहिवासी आहे. केदार हा 2002 मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाला. तसेच 2007 पासून तो उत्तर गडचिरोली विभागाच्या तांत्रिक समितीचा सदस्य झाला. तसेच 2012 पासून 2020 पर्यंत तो प्लाटून क्रमांक 15 मध्ये कार्यरत राहिला. त्यानंतर त्याची एरिया कमिटी सदस्य म्हणून बढती झाली. सध्या तो पश्चिम सबझोनल ब्युरोच्या तांत्रिक समितीचा सदस्य म्हणून काम पाहत होता. त्याच्यावर चकमकीचे 18, जाळपोळीचे 3, खुनाचे 8 आणि अन्य 6 अशा एकूण 34 गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने त्याच्यावर 6 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 2022 पासून आतापर्यंत 25 आणि आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून 673नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.