जळगाव – भुसावळ रेल्वे स्थानकावर १७ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. भुसावळ स्थानकाच्या साऊथ साइड बॅग स्कॅनर मशीन ड्युटीवर तैनात पी.ए. जोगिंदर नेरपगार आणि एमएसएफचे कर्मचारी दीपक वसंत बाविस्कर यांनी दोन्ही संशयितांनी बॅग स्कॅनिंगद्वारे नेलेल्या बॅगा तपासल्या असता, या बॅगमध्ये काही संशयास्पद वस्तू दिसल्या आणि त्यांना थांबवल्यानंतर ते पळू लागले आणि गर्दीचा फायदा घेत ते पळून गेले. सदर माहिती मिळताच निरीक्षक पी.आर. मीना, एसआयपीएफ एन. के सिंग आणि सीपीडीएस टीमचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. माहिती मिळताच सहाय्यक सुरक्षा आयुक्त भुसावळ अशोक कुमार हे प्रतिबंधित वस्तूंच्या संशयावरून नियमानुसार कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आणि पाचोसमोरील पिशव्या तपासल्या असता दोन्हीमध्ये खाकी टेपने झाकलेले 09 बंडल दिसले. दोन्ही पिशव्यांमध्ये सापडलेले बंडल चिन्हांकित करून उघडले असता त्यामध्ये बंदी असलेला गांजा आढळला. ज्याचे वजन काटा धारकाने पंचांसमोर केले. ज्यात वरील 09 बंडलमध्ये सापडलेल्या गांजाचे एकूण वजन 17 किलो आढळून आले, ज्याची अंदाजे एकूण किंमत 1,70,000 रुपये आहे. घटनास्थळी योग्य प्रक्रियेनंतर वरील गांजा पुढील कारवाईसाठी जीआरपी भुसावळकडे सुपूर्द करण्यात आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून जीआरपी /बीइसएल द्वारे तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, जीआरपी /बीइसएल सोबत एक टीम तयार करून संशयित आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.