हरियाणा – विनेश फोगाटची चुलत बहिण बबिता फोगाट २०१९ मध्ये भाजपकडून दादरी विधानसभा निवडणूक लढवली होती, तर विनेश काँग्रेसच्या जवळ असल्याचे दिसते. या दोन्ही बहिणींच्या राजकीय मतभेदांमुळे दादरी विधानसभा मतदारसंघात स्पर्धा होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर बबिता आणि तिच्या नवऱ्यांनी विनेशवर अप्रत्यक्षपणे टीका केली असून, यामुळे बहिणींमधील राजकीय तणाव उघड झाला आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटच्या राजकारणात प्रवेशाची शक्यता हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात विनेशने राजकारणात येण्याबद्दल संकेत दिले, परंतु यासाठी तिने ज्येष्ठांचा सल्ला घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या ती आपल्याला धक्क्यातून सावरत असल्याचे तिने सांगितले. हरियाणा विधानसभा निवडणुकीत शेतकरी आंदोलन, कुस्तीपटूंचे आंदोलन, सरकारी कर्मचाऱ्यांचा असंतोष आणि जाट समाजाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. विनेश फोगाटच्या राजकारणात येण्यामुळे या सर्व मुद्द्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पॅरीस ऑलम्पिकमध्ये विनेशची कामगिरी सरस ठरली असली तरी तिच्या एका स्वप्नाचा भंग झाला होता, त्यामुळे तिचा राजकारणात प्रवेश हा एक नवीन वळण घेऊ शकतो.