गणेशोत्सवात कडक बंदोबस्त; उत्सवी गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

0

पुणे –  वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ शनिवारी ( ७ सप्टेंबर) होणार आहे. उत्सवाच्या कालावधीत शहर, तसेच उपनगरात कडक बंदोबस्त राहणार आहे. उत्सवाच्या कालावधीत सात हजार पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. संभाव्य घातपाती कारवाया, अनुचित घटना विचारात घेऊन पुणे पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्त जी. श्रीधर यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. उत्सवाच्या कालावधीत मध्यभगात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

भाविकांकडील मोबाइल चोरी, दागिने चोरी, तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस बंदोबस्त तैनात केले जाणार आहेत.उत्सवाच्या कालावधीत पाच हजार पोलीस कर्मचारी, अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, बाहेरगावाहून मागविण्यात आलेले पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या बंदोबस्तात राहणार आहे. बंदोबस्तास पोलीस मित्र सहाय करणार आहेत. उत्सवाच्या कालावधीत मानाच्या मंडळांसह गर्दीच्या ठिकाणची बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. पथकातील प्रशिक्षित श्वान, पोलीस कर्मचारी गर्दीच्या ठिकाणाची दिवसभरातून चार वेळा तपासणी करणार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech