पॅरिस – पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने 26 वे पदक जिंकले आहे. प्रवीण कुमारने शुक्रवारी पुरुषांच्या उंच उडी T-64 च्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने 2.08 मीटर उडी मारून आशियाई विक्रम केला. या पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे सहावे सुवर्ण आहे. पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडीत सुवर्ण जिंकणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे.
लहान पायांसह जन्मलेल्या प्रवीणने सहा खेळाडूंमध्ये हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करत पुरुषांच्या उंच उडी T-64 च्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. त्याने 2.08 मीटर उडी मारून आशियाई विक्रम केला. अमेरिकेच्या डेरेक लोक्सिडेंटने 2.06 मीटरच्या उडीसह रौप्य, तर उझबेकिस्तानच्या टेमुरबेक गियाझोव्हने 2.03 मीटरच्या वैयक्तिक उडीसह कांस्यपदक जिंकले.
प्रवीण कुमारच्या मदतीने भारत पदकतालिकेत 14 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 11 कांस्य, अशी एकूण 26 पदके जिंकली आहेत. पॅरालिम्पिकमधील भारताची ही सर्वकालीन सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 5 सुवर्णांसह 19 पदके जिंकली होती.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथील प्रवीण मरियप्पन (२१) हा पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक जिंकणारा थंगावेलू नंतरचा दुसरा भारतीय पॅरा ॲथलीट आहे. आता प्रवीण कुमार पॅरिसमध्ये पदक जिंकणारा तिसरा भारतीय उंच उडीपटू ठरला. त्याच्या आधी शरद कुमारने रौप्यपदक जिंकले होते, तर मरियप्पनने पुरुषांच्या T63 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून प्रवीण कुमारचे अभिनंदन
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवीण कुमारच्या जिद्द आणि दृढ निर्धार या गुणांचेही कौतुक केले.पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले: “#पॅरालिम्पिक 2024 मध्ये नवीन शिखर गाठल्याबद्दल आणि पुरुषांच्या उंच उडी T64 मध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल प्रवीण कुमारचे अभिनंदन! त्याच्या जिद्द आणि दृढ निर्धार यामुळे आपल्या देशाला हा गौरव लाभला आहे.भारताला त्याचा अभिमान आहे!