नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे राज्यपाल राधाकृष्णन यांच्या स्वागतासाठी जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता भुजबळ यांनी आपला दौरा यापूर्वीच नियोजित केला आहे त्यामुळे राज्यपालांच्या स्वागताला जाण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सरकारच्या कामकाजाविषयी सातत्याने नाराज आहे त्यांनी विविध प्रश्नांवरून सरकार वरती सातत्याने नाराज व्यक्त केले आहे त्यातच नाशिक मुंबई महामार्गाचा विषय म्हणजे भुजबळांनी अतिशय जिव्हाळ्याने मांडून देखील सरकारने कोणत्याही निर्णय घेतला नाही आणि या प्रश्नांमध्ये भुजबळांना कोणी साथही दिली नाही नाशिकच्या नागरिकांच्या व्यतिरिक्त राजकीय स्तरावर ती भुजबळांना या प्रश्नावर ती कोणाचीही मदत झाली नाही फक्त तोंडी आश्वासन मिळाली या व्यतिरिक्त जरांगे पाटील यांच्या विषयावरती देखील भुजबळांना पाहिजे तसं राजकीय पाठबळ मिळालं नाही यामुळे नाराज असलेले भुजबळ हे आपली नाराजी व्यक्त करीत आहे.
सोमवारी राज्यपाल राधाकृष्णन हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी नाशिक दौऱ्यावर असलेले राज्याचे ओबीसी नेते आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ हे जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केलेल्या दौऱ्यानुसार स्पष्ट झालेले आहे ज्यावेळी राज्यपाल नाशिक मध्ये येणार आहेत त्यावेळी छगन भुजबळ म्हणजेच सकाळी साडेदहा वाजता निफाड दौऱ्यावरती आहे पण भुजबळ हे राज्यपालांच्या दौऱ्याला हजर राहणार नाही तसेच राज्यपालांनी बोलवलेल्या आमदार खासदारांच्या बैठकीला देखील भुजबळ उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधला असता भुजबळांनी हा दौरा आधीच निश्चित केलेला आहे त्यामुळे राज्यपालांच्या स्वागताला किंवा बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.