एमपॉक्स संसर्गाच्या संशयित रुग्णाची सखोल तपासणी

0

नवी दिल्ली – एक तरुण पुरुष रुग्ण, ज्याने नुकताच Mpox (मंकीपॉक्स) संसर्गाचे रुग्ण आढळत असलेल्या देशातून प्रवास केला होता, त्याची एमपॉक्स संसर्गाचा संशयित रुग्ण म्हणून नोंद केली गेली आहे. या रुग्णाला एका निर्दिष्ट रुग्णालयात वेगळे ठेवण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. एमपॉक्सच्या संसर्गाची पुष्टी करण्यासाठी रुग्णाच्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे. स्थापित नियमानुसार हे प्रकरण व्यवस्थापित केले जात आहे आणि संसर्गाचा संभाव्य स्त्रोत ओळखण्यासाठी तसेच देशातील प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा तपास घेणे सुरू आहे.

या प्रकरणाचा विकास राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) द्वारे पूर्वी केलेल्या जोखीम मूल्यांकनाशी सुसंगत आहे आणि कोणत्याही अनावश्यक चिंतेचे कारण नाही. देश अशा वेगवेगळया प्रवासाशी संबंधित प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि संभाव्य जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी आणि जोखमीचा प्रभाव कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech