श्री तुळजाभवानी मंदिराचा लोगो आणि प्रसिद्धीबाबत तज्ञांकडून मागिवले सादरीकरण

0

धाराशिव – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा नव्याने लोगो तयार करण्यासह श्री तुळजाभवानी मंदिराची व्यापक प्रसिध्दी व इतर व्यवस्थाबाबत टेक्नॉलॉजी क्षेत्रातील तज्ञ/जाणकार/स्वारस्य असणाऱ्यांनी आकर्षक डिझाईनचे सादरीकरण श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे कार्यालयात 23 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे. सादरीकरण करणाऱ्यांना तीन व एक लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या खालील बाबींसाठी तज्ञ असणाऱ्यांकडून खालील बाबींच्या अधीन राहून सादरीकरण मागवण्यात येत आहे. यामध्ये अ ) श्री. तुळजाभवानी मंदिराचा लोगो डिझाईन करणेबाबत .1 ) लोगो हा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा आहे हे सहजरित्या समजणे आवश्यक आहे . 2) लोगो आकर्षक असावा. 3 ) लोगोच्या रंगसंगतीमध्ये सुबकता असावी. 4) लोगो कमीत कमी जागेतही स्पष्ट व आकर्षक दिसावा. 5) लोगोत इतर कोणत्याही लोगोशी साधर्म्य व सुसंगत नसावा. 6) श्री तुळजाभवानी मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक ,पारंपारीक रुढी, विधींचा अभ्यास करून लोगोचे आकर्षक असे डिझाईन सादर करावे. ब) श्री तुळजाभवानी मंदिराची व्यापक प्रसिध्दी व इतर व्यवस्थाबाबत. 1) उपरोक्त बाबीसाठी टेक्नॉलॉजीबाबत प्रस्ताव सादर करावेत. अ व ब चे कामासाठी प्रोत्साहनपर बक्षिसे मंदिरमार्फत देण्यात येणार आहेत.

सर्वोत्कृष्ट बक्षीस – इतर प्रोत्साहनपर बक्षीस दोन उपरोक्त सर्व बाबी तसेच इतर 3 लाख असणार आहे. 1 लाख प्रत्येकी असणार आहे. अनुषंगीक बाबी लक्षात घेऊन आपले आकर्षक डिझाईनचे सादरीकरण करावे तसेच श्री तुळजाभवानी मंदिराची व्यापक प्रसिध्दी व इतर व्यवस्थाबाबत टेक्नॉलॉजीबाबत सविस्तरपणे प्रस्ताव सादर करावा. अधिक माहितीसाठी shreetuljabhvanitemple@gmail.com इमेल आय.डी.वर किंवा ए.बी.चव्हाण 9403396131 यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech