नागपूर – देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी कार प्रकरणावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता फडणवीसांनी बावनकुळेंची बाजू घेत विरोधकांवर टीका केली आहे.‘ऑडी प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी काही तथ्य समोर आणली आहेत. पण ज्या पद्धतीने राजकारण केलं जात आहे, ते चुकीचं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना धरून टार्गेट करणे ते चुकीचे आहे.’ असं फडणवीस म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या ऑडी कार प्रकरणावरून विरोधकांनी आरोपांचा धुरळा उडवला आहे. या प्रकरणावर अखेरीस राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ऑडी प्रकरणाची एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी काही तथ्य समोर आणली आहेत. पण ज्या पद्धतीने राजकारण केलं जात आहे, ते चुकीचं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना धरून टार्गेट करणे ते चुकीचे आहे.’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.