नागपूर – नागपूर ‘हिट अँड रन’ प्रकरणात पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणातील तथ्ये जाणून घेण्यासाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे नागपूरला पोहोचल्या आहेत. “संकेत बावनकुळे हा दारू प्यायलेला नव्हता. संकेतचे दोन मित्र दारू प्यायलेले होते, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मग लाहोरी बारमध्ये संकेत हा दूध प्यायला गेला होता काय?” असा सवाल शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. त्या सीताबर्डी पोलिसांना भेटून घटनेच्या कारवाईसंदर्भात माहिती घेणार आहेत. तत्पूर्वी नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.