नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ऍक्सिस आणि एचडीएफसी बँकेवर वैधानिक आणि नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी कठोर कारवाई केली आहे. या दोन्ही बँकांना एकूण 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासंदर्भात आरबीआयने, मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकिंग नियमन कायद्यातील काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल खाजगी क्षेत्रातील ऍक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेला अनुक्रमे 1.91 कोटी आणि 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोन्ही बँकांना एकूण 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.बँकिंग नियमन कायद्याच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल आणि ‘ठेवीवरील व्याज दर’ तसेच केवासी आणि कृषी कर्जे’ यावरील काही निर्देशांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने ऍक्सिस बँकेला दंड ठोठावला आहे त्याचबरोबर ‘ठेवीवरील व्याजदर’, ‘बँकांचे रिकव्हरी एजंट’ आणि ‘बँकांमधील ग्राहक सेवा’ यासंबंधी काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल एचडीएफसी बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.