काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा उघड….!

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर डागली टीकेची तोफ……

मुंबई – अनंत नलावडे

काँग्रेस सत्तेत आल्यास पुढच्या काळात आरक्षण रद्द करण्याचा विचार करू असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी संतप्त होत टीकेची तोफ च डागली.गांधी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा आता उघड झाल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी एक्स या समाज माध्यमावर व्यक्त होताना सडकून टीका केली.

विदेश वारीवर असलेले व एका जबाबदार संवेधनिक पदावर असलेल्या राहूल गांधी यांनी आरक्षण संपवण्याची भाषा करणारे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी तर असून संतापजनकच आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप बहुमताने सतेत्त आल्यास देशाचे संविधान बदलेल असा खोटा प्रचार स्वतः काँग्रेस व त्यांची इंडी आघाडीने करतं देशभर खोटा भ्रमाचे वातावरण भाजप व त्यांच्या मित्र पक्षांच्या विरोधात संभ्रमाचे जाळे विणले.व आता तेच राहूल लोकसभेत विरोधी पक्षनेता या जबाबदारीच्या पदावर बसले त्यांनी विदेशात जावून या भारत देशाची प्रतिमा जगभर मलिन केल्याचा थेट आरोपही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.

मात्र असे जरी असले तरी महायुतीतील जबाबदार घटक पक्ष म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही ठामपणे आरक्षणाच्या बाजूनेच असल्याने असे कुणालाही असणारे आरक्षण संपवू देणार नाही.आरक्षण अबाधितच राखण्यासाठी रालोआ आणि महायुती सदैव सज्ज असून काँग्रेसला जनताच धडा शिकवेल असा थेट निर्वाणीचा इशाराच मुख्यमंत्री शिंदे यांनी गांधी यांना दिला.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावरुन केलेल्या विधानाची सध्या देशभर चर्चा सुरु असून परदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते राहुल गांधी करतात.त्यांच्याकडून देशप्रेमाची अपेक्षा करणेच चुकीचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचवेळी राहूल गांधी यांची आरक्षण विरोधी भूमिका म्हणजे आता त्यांच्या पोटातलं ओठावर आले,असेच म्हणावे लागेल.मात्र यानिमित्ताने का होईना आता काँग्रेसच्या नेत्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून देशात विविध राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणूका व राज्यात होवू घातलेल्या विधानसभा यांना जनता आपला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही,असा संतप्त इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमाने जनतेला आरक्षण मिळत असून याच काँग्रेसने नेहमी बाबासाहेबांचा अवमानच केला. त्यांना निवडणुकांमध्ये पराभूतही केले होते याची आठवण करून देत त्यामुळेच खुद्द बाबासाहेबांनीही काँग्रेस हे जळके घर असल्याचे म्हटले होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

परदेशात जाऊन देशविरोधी वक्तव्य करायचं हे गांधी यांचे कोणते देशप्रेम आहे?असा परखड सवालही त्यांनी काँग्रेसला केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचा नाव लौकिक वाढत असताना आणि त्यांच्याच नेतृत्वात ११ क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था सध्या पाचव्या क्रमांकावर घोडदौड करत आहे. एकीकडे देश प्रगतीपथावर असताना परदेशात जाऊन भारतीयांचा अपमान करण्याचा अधिकार गांधी यांना कुणी दिला असाही रोखठोक सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधी व राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना विचारला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech