धर्मनिरपेक्ष भारताचे एक छान चित्र – खा. संजय राऊत

0

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेशपूजा सोहळ्यानिमित्त हजेरी लावली. यावेळी नरेंद्र मोदींनी श्री गणेशाची आरती देखील केली. मात्र नरेंद्र मोदींनी धनंजय चंद्रचूड यांच्या घरी भेट दिल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेत निशाणा साधला. धनंजय चंद्रचूड देशाचे सरन्यायाधीश आहेत. नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होत आहेत आणि पंतप्रधान गणेशोत्सवासाठी किती जणांच्या घरी गेले त्याची माझ्याकडे माहिती नाही. पण काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आरतीसाठी गेले, त्यांच्या दोघांचा संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र पाहायला मिळालं, असं संजय राऊत म्हणाले.

धनंजय चंद्रचूड देशाचे सरन्यायाधीश आहेत. नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होत आहेत आणि पंतप्रधान गणेशोत्सवासाठी किती जणांच्या घरी गेले त्याची माझ्याकडे माहिती नाही. पण काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आरतीसाठी गेले, त्यांच्या दोघांचा संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र पाहायला मिळालं, असं संजय राऊत म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech