धनगर आरक्षणप्रश्नी सोलापूरात चंद्रकांत पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट
सोलापूर – धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथिगृहावर समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक होणार आहे. सरकार नेहमीच धनगर समाजाच्या पाठीशी राहिले आहे. ‘धनगर’ आणि ‘धनगड’ ठरविण्याचा अधिकार हा आदिवासी आयोगाला आहे. तरीही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नक्कीच तोडगा निघेल. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने येथील टिळक स्मारक मैदानावर गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.
चंद्रकांत पाटील, देसाई, माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांच्या शिष्टमंडळाने आंदोलकांशी चर्चा केली. पाटील म्हणाले की, धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथिगृहावर बैठक बोलावली आहे. समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर सरकार चर्चा करणार आहेत.सरकार आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक आहे. आंदोलकांनी टोकाची भूमिका न घेता सनदशीर मार्गाने आंदोलन करावे.