कोल्हापूर – कोल्हापुरात राधानगरी येथील खासगी क्लासमध्ये शिकत असणा-या नऊवर्षीय चिमुकलीवर ७३ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे कोल्हापूर हादरून गेले असून, राज्यात महिला आणि चिमुकलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या खासगी क्लासमध्ये ७३ वर्षीय श्रीपती भोसले याआरोपींने पिडीतेला क्लासमध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायदा अंतर्गत श्रीपती भोसले या ७३ वर्षीय नराधमावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, राधानगरी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.