वर्ध्यात पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याची जय्यत तयारी

0

वर्धा – वर्धा येथे २० सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा स्वावलंबी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या सोहळ्याला राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री व मंत्री उपस्थित राहणार आहेत.अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमीपूजन, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही पतंप्रधान महोदयांच्या हस्ते यावेळी होणार आहे.

सदर समारंभाची नोडल एजन्सी एमएसएमई (सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, मंत्रालय, भारत सरकार) आहे. पीएम मित्रा पार्क अमरावती यांचे ई-भूमीपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभ पतंप्रधान महोदयांच्या हस्ते होणार आहे. सदर समारंभासाठी स्वावलंबी विद्यालयाचे मैदान निश्चित केले आहे. पीएम विश्वकर्मा योजनेतील यशस्वीगाथा दर्शविण्यासाठी थीम पॅव्हेलीयनची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये देशभरातील १८ कारागिरांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचा समावेश आहे. सदरची प्रदर्शनी आंतरराष्ट्रीय दर्जाची असणार आहे. समारंभानंतर दोन दिवस वर्धा जिल्ह्यातील व विदर्भातील सर्व नागरिकांसाठी खुली राहणार आहे.

कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृती खरेदी साठी सुध्दा उपलब्ध राहणार असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले आहे. थीम पॅव्हेलियन येथे पंतप्रधान कारागिरांशी संवाद साधणार आहे. यानंतर पंतप्रधान जनसभेला संबोधित करणार आहेत. यासाठी सुसज्य अशा पेंडालची निर्मिती करण्यात आली आहे. जनसभेला साधारणतः ५० हजार जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. त्यामध्ये १५००० विश्वकर्मा, ५००० आयटीआय प्रशिक्षणार्थी, स्वयंसाहय्यता गटाच्या २०००० महिलांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अमरावती आणि यवतमाळ येथून ५००० विश्वकर्मा उपस्थित राहणार आहे. याशिवाय काही मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

पीएम टेक्स्टाईल पार्क भूमिपूजन
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील एकमेव अमरावती येथील १ हजार २० एकरात उभारण्यात येणाऱ्या पीएम मेगा टेक्सटाईल पार्कची पायाभरणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने होणार आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना किट वाटप केले जाणार असून प्रधानमंत्री लाभार्थ्यांशी संवादही साधणार आहेत. हा कार्यक्रम देशभरात ७०० ठिकाणी पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech