काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात हिंसक वक्तव्य करणाऱ्यांना अटक करा…….!

0

काँग्रेस शिष्टमंडळाचे राज्यपालांना निवेदन,……..

मुंबई -अनंत नलावडे

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेनेचे आ.संजय गायकवाड यांनी जीभ छटण्याची तरं भाजपचे खा.डॉ.अनिल बोंडे यांनी जिभेवर चटके देण्याची वादग्रस्त व हिंसक विधाने केलेली असतानाही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बघ्याची भूमिका घेतली.त्यावरून राहूल गांधी यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.यासंदर्भात दोन्ही लोकप्रतिनिधीं वर गुन्हे दाखल झाल्याने त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने शनिवारी राजभवनावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेऊन दिले.

त्याचवेळी विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतानाही त्यांना अद्याप मदत मिळाली नाही.यामुळे जनतेमध्ये,तेथील शेतकरी वर्गात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे.कारण आजमितीस तब्बल सहा लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले असताना अजूनही याचे पंचनामे झालेले नाहीत.केंद्रीय कृषी मंत्री आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचा दौरे करून मदत जाहीर करतात.पण महाराष्ट्रात मात्र अजूनही केंद्रीय कृषीमंत्री किंवा केंद्रीय पथक पाहणी करण्यास आलेले नाही.मग महाराष्ट्रातीलच शेतकऱ्यांबाबत इतका दूजाभाव का ? या राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा दिसत नाही का त्यांना मदत करण्याची केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका नाही,असा सवालही शिष्टमंडळाने निवेदनात उपस्थित केली.

यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ.भा.काँ.स.सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,खा.चंद्रकांत हंडोरे, विशाल पाटील,आ.अस्लम शेख,अमीन पटेल,नितीन राऊत,विश्वजित कदम, विक्रम सावंत,सचिन सावंत उपस्थित होते.

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी व संतापजनक घटना अलीकडेच घडली.तरी अजून सबंधित लोकांवर कारवाई झालेली नाही.अशात सत्ताधारी लोकप्रतिनिधी हिंसेला प्रवृत्त करण्याची भाषा वापरणे हे कायद्याला धरून नाही.यावरून असे वाटते की,राज्यात दंगली घडवण्याचा सत्ताधारी पक्षांचा कट तर नाही ना, अशी शंकाही काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली असताना राज्यात होवू घातलेली विधानसभा निवडणूक तरी निर्भय वातावरणात होईल याबाबत शंका व्यक्त करण्यात आली.त्याचवेळी राज्यात महिलांवरील अत्याचारातही मोठया प्रमाणावर वाढ झाली असून अल्पवयीन,शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या बदलापूर व नागपूर येथे घडलेल्या गुन्ह्यात आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सरकारकडून केले जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

राज्यात स्पर्धा परीक्षा रखडल्या असून उमेदवारांना सरकारकडून अद्याप नियुक्त्याही देण्यात आलेल्या नाहीत. त्यामूळे युवा पिढी बेरोजगारीमुळे नैराश्याच्या गर्तेत जात असताना ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण सरकारला निर्देश द्यावेत अशी राज्यातील जनतेची आपणाकडून अपेक्षा असल्याचेही काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात ठळकपणे नमूद केले आहे. त्यावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनीही या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे आश्वासन काँग्रेस शिष्टमंडळाला दिलेले असून वादग्रस्त विधानबाबतही गृह खात्याकडून माहिती घेऊन कडक कारवाई करण्याचे आश्वासनही राज्यपालांनी दिल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech