गुगल भारतात करणार एआयमध्ये गुंतवणूक

0

वॉशिग्टंन डीसी – जगातील बलाढ्य कंपनी असलेली गुगल भारतात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रात गुंतवणूक करणार असल्याची माहिती गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली. अमेरिका दौर्‍यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेक कंपन्यांच्या प्रमुख सीईओंबरोबर घेतलेल्‍या बैठकीनंतर पिचाई बोलत होते.

यासंदर्भात सुंदर पिचाई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीनी भारताचा कायापालट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हे डिजिटल इंडियाचे व्हिजन आहे. ते कृषी आणि भारताच्या पायाभूत सुविधांबद्दलही विचार करत आहेत. आम्ही भारतामध्ये एआय क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहोत. भारतात बनवलेल्या पिक्सेल फोनचा आम्हाला अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील कृषी आणि पायाभूत सुविधांबद्दलही सखोल विचार करत आहेत. आम्ही भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहोत. भारतात आम्‍ही आमची भागीदारी निश्‍चित केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स भारतीय जनतेच्‍या फायद्यासाठी आहे. याचा वापर भारतातील लोकांच्या सेवेसाठी असला पाहिजे अशी पंतप्रधान मोदी यांची दृष्टी आहे. त्‍यांचा हा दृष्‍टीकोन आम्‍हाला एआय क्षेत्रात अधिक काम करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देत असल्‍याचेही सुंदर पिचाई यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech