मुंबई – राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमात (ST) प्रवर्गातून आरक्षण देण्याचा शासन निर्णय (जीआर) काढल्यास ६० ते ६५ आमदार राजीनामा देतील, असा इशारा अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे. सरकार कोणताही अभ्यास न करता हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी राज्य सरकारला आगामी निवडणुकीसाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप केला.
झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने धनगर आणि धनगड यांच्यात फरक स्पष्ट केल्यानंतरही सरकारचा निर्णय चुकीचा आहे. तसेच, आदिवासी आमदारांची बैठक बोलावून या मुद्द्यावर आगामी रणनीती ठरवली जाईल, असेही त्यांनी सूचित केले. याच विषयावर काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, जर धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर ते आमदारकीचा राजीनामा देतील.