राज्यातील वातावरण बदलण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर – संजय राऊत

0

नाशिक – राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी जे वातावरण निर्माण केलं आहे ते शांत करण्यासाठीच अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर केला गेल्याचा गंभीर आरोप उबाठा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी करताना म्हटले आहे की, राज्यातील जनताच एकनाथ शिंदे यांचा एन्काऊंटर करणार आहे. उबाठा शिवसेना नेते खासदार संजय राऊत नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे कार्यक्रमासाठी आले होते. त्यापूर्वी ते नाशिक मध्ये काही काळ थांबले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे, उपनेते सुनील बागुल, दत्ता गायकवाड, विनायक पांडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, अक्षय शिंदे हा बदलापूर प्रकरणातील आरोपी हा सफाई कामगार असून त्याला रिवाल्वर चालविण्याचे प्रशिक्षण कोणी दिले. रिवाल्वर ही लॉक असताना तिचे लॉक ओपन कसे झाले यासारखे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं जनतेला मिळाली पाहिजे. जनतेला हे माहिती आहे की झालेले एन्काऊंटर हे पूर्णपणे मॅनेज केलेले आहे. त्यामुळे त्याच्यावरती सरकारने खुलासा देऊ नये. पण सरकार अक्षय शिंदेच्या या माध्यमातून कोणाला वाचवत आहे. संस्थाचालकांवरती गुन्हे दाखल होऊन सुद्धा ते अटक का झाले नाहीत असा प्रश्न उपस्थित करून राऊत पुढे म्हणाले की, जे आंदोलन झाले त्या आंदोलन वरती दाखल असलेले गुन्हे हे सरकारने मागे घेतले पाहिजे.

ज्या सरकारने एन्काऊंटर केले आहे. त्या सरकारने आंदोलनकर्त्यांची मागणीच पूर्ण केली आहे. मग आंदोलन करताना वरती गुन्हे का दाखल करावेत असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे ‌‌. खासदार संजय राऊत बोलताना पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरती जे खटले चालू आहे ते सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्यासमोर चालू आहे. मग जर आरोपीच सरन्यायाधीशांबरोबर बसून चहापाणी आणि मस्करी करणार असेल तर न्यायची अपेक्षा कोणाकडून करावी असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यामध्ये सध्या सरकारची खुर्ची धोक्यात आहेत. त्याचे कारण म्हणजे मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केले आहे ते सरकारच्या खुर्चीला त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे त्यावरील लक्ष हाटविण्यासाठी म्हणूनच अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर केला आणि राज्यातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech