राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने मतदार नाराज, पण ८० टक्के लोकांना समजवण्यात यश: फडणवीस

0

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले की अजित पवार यांना महायुतीत सामील केल्याने भाजपच्या मतदारांमध्ये नाराजी होती. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. फडणवीसांनी स्पष्ट केले की राष्ट्रवादीला सोबत घेण्याची तडजोड कार्यकर्त्यांना आवडली नसली, तरी परिस्थिती समजावून सांगण्यात भाजपला ८० ट्क्के यश मिळाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले की अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत सामील केल्याने भाजपच्या अनेक मतदारांमध्ये असंतोष पसरला होता. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसण्यात झाला. या प्रश्नावर भाष्य करताना फडणवीसांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादीसोबत केलेली तडजोड भाजपच्या कोअर समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना सुरुवातीला पचनी पडली नाही.फडणवीस यांनी नमूद केले की, विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादी काँग्रेसवर सर्वाधिक टीका करण्यात आली होती.

विशेषतः ७० कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून. त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेतल्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी स्वाभाविक होती. मात्र, परिस्थितीचा आढावा घेतल्यावर आणि राजकीय गणित समजावून सांगितल्यानंतर पक्षाने त्यांना समजवण्यात यश मिळवले आहे.फडणवीसांनी म्हणाले की, हो, राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने आमच्या मतदारांना ती तडजोड अजिबात आवडली नाही. पण, जेव्हा आम्ही त्यांना सांगितले की कोणत्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आली आणि आम्हाला ती तडजोड करावी लागली, तेव्हा ८०% लोकांना आम्ही समजवण्यात यशस्वी झालो आहोत. १००% नाही, पण आमचे बहुसंख्य समर्थक या निर्णयामागची अपरिहार्यता समजून घेत आहेत.फडणवीसांनी हे देखील सांगितले की, राजकारणात काही वेळा अशा तडजोडी कराव्या लागतात ज्या लोकांना मनापासून आवडत नाहीत, पण त्या अपरिहार्य असतात.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech