सोमवारपर्यंत अंत्यविधी करा- हायकोर्ट

0

अक्षय शिंदेबाबत मुंबई हायकोर्टाचे निर्देश

मुंबई – बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी बदलापूरनंतर अंबरनाथ शहरातूनही विरोध झाला. त्यामुळे, दफनविधीच्या मुद्यावरून अक्षयच्या पालकांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. त्यावर हायकोर्टाने सोमवारपर्यंत अक्षयचा अंत्यविधी करा, असा आदेश  आता हायकोर्टाने दिला आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायकोर्टाच्या सूचना योग्यच असून, त्याचा अंत्यविधी झालाच पाहिजे, असे स्पष्ट केले.

अक्षयच्या पालकांनी गुरुवारी अंबरनाथमधील हिंदू स्मशानभूमी येथे दफनविधीची जागा पाहिली. त्यानंतर परवानगीसाठी अंबरनाथ पालिकेत गेले असता त्यांचा अर्ज स्वीकारला नाही. मनसेच्या वतीने शहरात दफनविधीला विरोध केला. यानंतर अक्षय शिंदेच्या पालकांचे वकील अमित कटारनवरे यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे न्यायालयाने सोमवारपर्यंत अंत्यविधी करण्याचा आदेश दिला आहे…

मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठाने पोलिसांना यासंबंधी आदेश दिले. सध्या अक्षय शिंदेचे पार्थिव जेजे रुग्णालयातील शवागरात ठेवण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech