नोव्हेंबरपर्यंत पैसे मिळतील, पुढे पैसेच राहणार नाहीत – राज ठाकरे

0

अमरावती – शासनाने आणलेल्या लाडकी बहीण योजनेतून नोव्हेंबर पर्यंत पैसे मिळतील. परंतु पुढे डिसेंबर, जानेवारीमध्ये मात्र सरकारच्या तिजोरीत पगाराला पैसे राहणार नाहीत. जर महिलांना सक्षम करायचे असेल तर उद्योग उभारणी करण्याची गरज आहे. सरकारकडे कोणीही फुकट काहीही मागत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शासनाच्या चुकीच्या धोरणावर एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारपासून अमरावतीमध्ये आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते विदर्भातील प्रत्येक विधानसभा निहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी अनौपचारीक संवाद साधला. ते म्हणाले शेतकऱ्यांनी कधीही राज्यात फुकट वीज मिळावी म्हणून आंदोलने केलेली नाहीत. परंतु तरीही सरकारने फुकट वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्ताधारी आणि आज विरोधात असलेले तेही कधीतरी सत्तेत होते, त्यांना ज्या प्रकारची प्रश्न माध्यमांकडूनही विचाराणे अपेक्षित आहेत, तशी प्रश्न उपस्थित केली जात नाहीत. लाडकी बहीण योजनेतून ऑक्टोंबर, नोव्हेंबर पर्यंत पैसे महिलांना मिळतीलही परंतु त्यानंतर काय? जानेवारीत तर सरकारच्या तिजोरीत पगार द्यायला पैसेच उरणार नाहीत. त्यामुळे सक्षमीकरणासाठी उद्योग उभारायचे सोडून फुकट पैसे देण्याची सवयी काय लावताय असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आढावा बैठकीमधून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. अनेकजण निवडणूक लढविण्यास तयार आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेण्यासाठीही अनेक इच्छुक आहेत. तसेच या बैठकीमध्ये कोणाचीही उमेदवारी जाहीर होणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech