शहापुर तालुक्यात कृषी महाविद्यालय व कृषी संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणी

0

ठाणे – शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असल्याने शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे तानसा, वैतरणा आणि भातसा ही याच तालुक्यात आहेत. मुंबईची व ठाण्याची पिण्याच्या व औद्योगिक क्षेत्राची पाण्याची गरज पूर्णतः शहापूर तालुका भागवतो. सह्याद्रीने वेढलेल्या शहापूर गावालगत किल्ले माहुली व आजोबा डॊंगर ही गिर्यारोहणाची ठिकाणे आहेत. शहापूर तालुका हा धरणांचा तालुका म्हटले तर वावगे ठरु नये. तानसा, वैतरणा, भातसा ही मोठी धरणे तर खराडा, जांभा डोळखांब ही छोटी धरणे तसेच चोंढा प्रकल्प ही शहापूर तालुक्याची वैशिष्ट्ये आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीची मुंबईची पाण्याची गरज ही तीन मोठी धरणे पूर्ण करीत आहेत. यातील तानसा धरण हे एक शतकापूर्वीचे आहे. त्यामुळे ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी महाविद्यालय व कृषी संशोधन केंद्र सुरू करण्यासाठीची मागणीचा आता जोर धरला आहे. व त्यासंबंधी मागणीचे पत्र राज्याचे विद्यमान राज्यपाल यांच्या पाठविण्यात आल्याची माहिती उद्यानपंडीत पुरस्कार प्राप्त शेतकरी बबन हरणे यांनी दिली आहे.

ठाणे जिल्हयातील शहापूर हा एकमेव पेशा क्षेत्रातील आदिवासी बहुल तालुका, संपूर्णतः ग्रीन झोन असलेल्या या तालुक्यात तानसा, भातसा वैतरणा या महाकाय धरणांसोबत लघुपाटबंधारे विभागाचे ७ लहान बंधारे, शाई, वैतरणा, भातसा या बारमाही नद्यांमूळे मोठ्या प्रमाणात भातशेती, भाजीपाला लागवड, कडधान्ये व फळबागा लागवडी आहेत. ठाणे जिल्हयातील भात दक्षेत्र ७० हजार हेक्टर इतके तर दीड लाख शेतकरी खातेदार आहेत. शहापूर-मूरबाड तालुक्यातील काकडी, भेंडी परदेशात निर्यात होते. मात्र येथे कृषि विज्ञान केंद्र जवळ नाही, संशोधक नसल्याने शेतक-यांना मार्गदर्शन विषयक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यात कृषी महाविद्यालय व कृषी संशोधन केंद्र झाल्यास त्याचा फायदा शहापूर-मुरबाड या शेतीबहुल क्षेत्रासह संपूर्ण ठाणे जिल्ह‌यास होईल व शेतक-यांना त्याचा लाभ होउन आधुनिक पध्दतीने शेती करणे या सह नविन पिढीला कृषीविषयक शिक्षण व प्रशिक्षण मिळाल्यास गोरगरीबांची मुलेही कृषी पदवीधर होतील. असेही यावेळी बबन हरणे यांनी सांगितले.

ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यात सर्वात जास्त बरणे व सिंचनासाठी पाण्याची सुविधा उपलब्य असल्याने शहापूर तालुक्यातील शेकडो गावात भाजीपाला, कडधान्ये, फळपीके व रानभाज्या आदि लागवड मोठ्या प्रमाणात होत असून परदेशात ही भाजीपाला मोठ्या प्रमाणात निर्यात केला जात आहे. पंरतू भात, फळपीके, कडधान्य व भाजी या शेतक-यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून विक्री केल्यास शेतक-यांना ज्यास्तीचा नफा मिळेल शिवाय रोजगारातही वाढ होईल.शहापूर तालुक्यात शेतमालावरील प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात यावे. व ठाणे जिल्हयातून जाणारे मुंबई-वडोदरा महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग, शहापूर-कर्जत-खोपोली-महामार्गावरील सरकारी जागा व इंरटवेज वरील सुविधा पॉईंटवर स्थानिक शेतक-यांनी पिकविलेला ताजा शेतमाल जसे की भाजीपाला, आंबे, काजू, चिकू, कडधान्ये, तांदूळ व रानभाज्या यांची शेतकरी ते थेट ग्राहक साखळी मजबूत करण्यासाठी छोटी तात्पूरती बाजार व्यवस्था व विक्री व्यवस्था पॉईट उभारणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech