देशातील 13 पूरग्रस्त राज्यांना 5,858.60 कोटींचा निधी

0

महाराष्ट्रासाठी जारी केला 1492 कोटी रुपयांचा निधी

नवी दिल्ली –  केंद्र सरकारने आज, मंगळवारी महाराष्ट्रासह देशातील 13 पूरग्रस्त राज्यांसाठी 5,858.60 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे. यात महाराष्ट्रासाठी 1492 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. याशिवाय केंद्रीय गृहमंत्रालयाने आसाम, मिझोराम, केरळ, त्रिपुरा, नागालँड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मणिपूर या पूरग्रस्त राज्यांना निधी जाहीर केला आहे.

आंध्र प्रदेशला 1036 कोटी, आसामला 716 कोटी, बिहारला 655.60 कोटी, गुजरातला 600 कोटी, पश्चिम बंगालला 468 कोटी, तेलंगणाला 416.80 कोटी, हिमाचल प्रदेशला 189.20 कोटी, केरळला 145.60 कोटी निधी जारी केला आहे. याशिवाय मिझोरामला 50 कोटी, नागालँडला 21.60 कोटी, सिक्कीमला 19.20 कोटी आणि त्रिपुराला 25 कोटी देण्यात आले आहेत. या राज्यांना यावर्षी मान्सूनमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला आहे. याव्यतिरिक्त, केंद्र सरकार लवकरच बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये पूर नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी पथके पाठवणार आहे. या दोन्ही राज्यांना नुकताच पुराचा फटका बसला आहे. पथकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त आर्थिक मदत या राज्यांना मंजूर केली जाणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech