बाजारात झेंडू दरवळला; नवरात्रोत्सवामुळे भाव झाले दुप्पट

0

अमरावती – नवरात्रोत्सवासाठी फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे फुलांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ४० ते ५० रुपये किलो दराने मिळणारी झेंडूची फुले आता ऐंशी ते शंभर रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. अन्य फुलांचे भावही वधारले आहेत. नवरात्रोत्सवासाठी फुलांना चांगली मागणी असते. निशिगंध, झेंडू, गलांडा, लीली, गुलाब या पारंपरिक फुलांसह जरबेरा, कॉर्नेशिया आदी हरितगृहातील विदेशी फुलांनाही मोठी मागणी असते. त्यामुळे या काळामध्ये बाजारात दर दुपटीने वाढले आहेत. मोठ्या आकारांची मूर्ती असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसह, घरगुती पूजेसाठी विविध प्रकारच्या फुलांना व फुलांच्या हारांना मोठी मागणी आहे.

यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे फुले अधिक प्रमाणात खराब होऊन फुलांचे उत्पादन घटले आहे. उत्पादन कमी असल्याने दर वाढले आहेत. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात फुलांची शेळी केली जात नाही. यासाठी वातावरण पोषक नाही. मात्र, काही ठिकाणी झेंडूची लागवड केली जाते. मात्र, सध्या तरी झेंडूच्या फुलांचे उत्पादन सुरू झाले नाही. फुले महागल्याने हारांच्या दरातही वाढ झाली आहे. किमान १५० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत फुलांच्या हाराची किमत आहे. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या दुर्गा मातेच्या मूर्तीसाठीच्या हारांचे दर किमान २०० रुपयांपासून एक ते दीड हजारांपर्यंत आहेत. ४० रुपये किलो मिळणारा झेंडू ८० ते ९० रुपये किलो आहे. मूर्ती पूजनासाठी लाल व पांढऱ्या फुलांना मागणी असल्याने फुलांचे दर सध्या वाढले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech